लालू यादव यांच्या मुलांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त

0

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांच्या मुलांची बेहिशेबी संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे.

तसंच राज्यसभेची खासदार आणि लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांना समन्स बजावून, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयकर विभागाच्या कार्यालयात हजर होऊन बेहिशेबी व्यवहारासंदर्भात स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे.

याआधी आयकर विभागाने लालूंच्या मुलांची 50 कोटींची संपत्ती जप्त केली होती. तसंच दोन दिवसांपूर्वीच लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रसाद यादव याला देण्यात आलेला पेट्रोलपंपाचा परवानाही रद्द करण्यात आला होता.

बेहिशेबी कलमांतर्गत 90 दिवसांच्या आत विभागाला स्पष्टकरण देणं आवश्यक आहे. जर संबंधित व्यक्तीने दिलेल्या मुदतीत स्पष्टीकरण दिलं नाही, तर जप्तीची कारवाई केली जाते.

LEAVE A REPLY

*