लालटाकी परिसरात मैलामिश्रीत पाणी

0

नगरसेवकाचे दुर्लक्ष, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लालटाकी भागात पंधरा दिवसापासून पिण्याच्या पाण्यात मैला येत आहे. स्थानिक नगरसेवक अरीफ शेख यांच्याकडे तक्रार करूनही ते या भागाकडे फिरकले नाही. लिकेज शोधणारी यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याने मैलमिश्रीत पाणी पुरवठा थांबविण्यात महापालिकेलाही अपयश आले आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा करणार्‍या नळाद्वारे मैलमिश्रीत पाणी येत असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दिवासाआड पाणी सुटून देखील मैलमिश्रीत येत असल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मैलमिश्रीत पाण्याने परिसरातील लहान मुले आजारी पडली आहे. तातडीने पाईपलाईनचे लिकेज शोधून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. लालटाकी भागातील नागरिकांनी हा प्रश्‍न स्थानिक नगरसेवक अरीफ शेख यांच्याकडे मांडला. मात्र त्यांनी करतो, पाहतो असे साचेबध्द उत्तर देत नागरिकांनी बोळवण केली. स्थानिक नगरसेवक गांभीर्यपुर्वक लक्ष देत नसल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

महापालिकेकडे यंत्रणाच नाही
शहरात पाईपलाईन लिकेज झाली तर ती शोधून दुरूस्तीचे काम करणारी यंत्रणाच महापालिकेकडे नाही. महापालिकेकडे कर्मचारी नसल्याने हे काम खासगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. चांदणे नावाचा ठेकेदार हे काम करतो. महापालिकेने वर्षापासून देयके अदा केलेली नाहीत. त्यामुळे या ठेकेदाराने लिकेज शोधून ते काढण्याचे काम थांबविले आहे. लिकेज शोधण्यासाठी जमिनीत जवळपास दहा-बारा फुटापर्यंत खोदाई करावी लागते. हे काम अंग मेहनीतचे आहे. शिवाय पाणी पुरवठा ही सेवा अत्यावश्यक सेवेत येते. कोट्यवधी रुपयांचे बजेट असतानाही ठेकेदाराचे देणी का थांबविली असा सवाल करत ज्येष्ठ नगरसेवक दीप चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार ‘नगर टाइम्स’कडे मांडला. महापालिकेत अभियंता भरता करता, कोणता अभियंता तुम्हाला साईडवर दिसतो? असा सवाल करत गरजेची माणसं भरती करावी किंवा कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने महापालिकेने माणसं नियुक्त करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.

LEAVE A REPLY

*