Type to search

नंदुरबार

लायन्स झोनच्या चेअरमनपदी सौ.कोतवाल यांची निवड

Share

नंदुरबार । लायन्स क्लबच्या यंदाच्या वर्षात झोन चेअरमन म्हणून सौ.सुप्रिया कोतवाल यांची निवड झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब नंदुरबार, लायन्स फेमिना नंदुरबार, शहादा लायन्स क्लब, अक्कलकुवा लायन्स क्लब सेवा कार्य करतील.

सौ.कोतवाल या 2015-16 मध्ये लायन्स परिवारात दाखल झाल्या. 2017-18 मध्ये फेमिना क्लबच्या अध्यक्षा झाल्यात. त्यांच्यातील नेतृत्त्व गुण व सेवाकार्य पाहून त्यांना झोन चेअरमन हे पद देण्यात आले. आपल्या लायन्स कारकिर्दीत सौ.कोतवाल यांनी बेस्ट ट्रेझरर, बेस्ट न्यु क्लब सिल्वर, अध्यक्षाची वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, बेस्ट ऍक्टिव्ह लायन, इंटरनॅशनल सेनटेनिअल मेम्बरशिप सॅटीस्फॅक्शन अ‍ॅवॉर्ड मिळवलेत. गेल्यावर्षी रक्तदानचे डिस्ट्रिक्ट चेअरमनपद सांभाळले होते. लायन्स परिवाराबरोबर त्या तनिष्का गट व जागृती महिला मंडळातसुद्धा सक्रिय आहे. या निवडी बद्दल त्यांचे लायन्स परिवरातर्फे व समाजातून अभिनंदन होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!