लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे कारगील विजय दिवस साजरा

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गुरुवार दि.26 जुलै रोजी संध्याकाळी हुतात्मा स्मारक येथे कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला. देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेले वातावरण व भारत माती की जय घोषात पुष्पचक्र अर्पणाने मेणबत्त्या प्रज्वलीत करुन शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी क्लबचे अध्यक्ष जस्मितसिंग वधवा, प्रकल्प प्रमुख हरजितसिंग वधवा, सचिव आनंद बोरा,सुनिल छाजेड, प्रशांत मुनोत, विजय कुलकर्णी, विपुल शहा, बिट्टू मनोचा, सी.ए. किरण भंडारी, आशिष भंडारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रविण साबळे, ऋषभ वाणी, सागर कुमटकर, कमलेश देवकर, सौरभ तरटे, विजय पवार, दिपक शिकारे, प्रविण शेंडगे, तुषार सागडे, विलाश भंडारे आदिंसह क्लबचे सदस्य व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरजितसिंग वधवा म्हणाले की, अत्यंत कठिण परिस्थितीत सैनिक शत्रूंपासून सीमा रक्षणाचे कार्य करत आहे. सैनिकांचे ऋण न फेडता येणारे असून, त्यांच्या प्रति कृतज्ञता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सैनिकांमुळेच नागरिक सुरक्षिततेचे जीवन जगत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशांत मुनोत यांनी केले. आभार धनंजय भंडारे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*