Type to search

नंदुरबार

लायन्स अध्यक्षपदी समीर शहा तर लायनेस फेमिना क्लब अध्यक्षपदी सौ.शहा

Share

नंदुरबार । येथील लायन्स परिवारची सन 2019-2020 साठीची नुतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. दि.7 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थित शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नंदुरबार लायन्स क्लब अध्यक्षपदी समीर शहा, सचिवपदी सतीश चौधरी, खजिनपदी नितिन जैन तर लायनेस व फेमिना क्लब अध्यक्षपदी सौ.चेतना शहा, सचिवपदी सौ.शीतल चौधरी व खजिनदारपदी डॉ.सौ.गायत्री पाटील यांची निवड झाली आहे. यासोबत विविध पदासाठीही कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. या नुतन कार्यकारिणीची शपथविधी दि.7 जुलै 2019 रोजी येथील कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित केला आहे.

यासाठी शपथविधी अधिकारी म्हणून माजी प्रांतपाल जयेश ठक्कर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आ.चंद्रकांत रघुवंशी, अमळनेरचे आ.शिरीष चौधरी, नगराध्यक्ष सौ.रत्नाताई रघुवंशी यांच्यासह लायन्सच्या रिजन चेअरमन डॉ.सौ.तेजल चौधरी, झोन चेअरमन सौ.सुप्रिया कोतवाल, लायनेस रिजन चेअरमन सौ.नंदा सोनार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पदग्रहण सोहळ्यानिमित्त विविध सेवा प्रकल्पांचे आयोजन करण्यात आले आहे, असे लायन्स परिवारातर्फे कळवण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!