लायनेसच्या क्षेत्रीत संमेलनात जळगाव क्लबला १६ पारितोषिक

0

जळगाव |  प्रतिनिधी :  लायनेसचे क्षेत्रीय संम्मेलन अध्यक्ष सुगंधा जैन यांच्या उपस्थितीत दोंडाईच्या येथे पार पडले.या संमेलनात जळगाव क्लबला १६ पारितोषिके मिळाली आहे.

लायनेसच्या क्षेत्रीय संमेलनात जळगाव क्लबच्या महिलांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. बॉलीवुड थीमवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रिती कर्नावट यांनी प्रथम क्रमांक मिळूवन ३ बक्षीसे पटकाविली.

अनिता कांकरिया यांनी ऍक्टीव मेंबरचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस तसेच निंबध स्पर्धेत लता बनवट यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच मुव्ही ऍक्ट, बॅनर प्रेझेटेंशन, बेस्ट प्रेसीडेंट, बेस्ट सेके्रटरी बेस्ट क्लब ऑफ द इयर मध्ये देखील जळगाव क्लब विजयी ठरले आहे.

जळगाव क्लबला प्रथम क्रमांकाचे ७, द्वितीय क्रमांकाचे २ तर तृतीय क्रमांकाचे ७ बक्षीसे मिळाली आहे. हया संमेलनात लता बनावट, अलका कांकरिया, प्रिती कर्नावट,उज्वला मुथा, सुनिता बरडिया, चंद्रकला सुराणा, सरिता कोठारी, कविता संचेती, आदींनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

*