लाभार्थी-कर्मचार्‍यांमध्ये वाद

0
शहादा / येथील पंचायत समिती कार्यालयात घरकुल योजनेचे काही लाभार्थी व दस्तावेज अपडेट करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये योजनेच्या अनुदानाबाबत चर्चा सुरु असतांना एका लाभार्थ्याने चप्पल काढून कर्मचार्‍यास मारण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. सुमारे एक तासभर कार्यालयात जोरजोरात संभाषण सुरू होते.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत गरीब आर्थिक दुर्बल घटकास घरकुल योजना राबवित आहे.

पंतप्रधान घरकुल योजना, रमाबाई घरकुल योजना, शबरी आवास योजना, राजीव गांधी-इंदिरा गांधी घरकुल आवास योजना सुरू आहेत. शहादा पंचायत समिती अंतर्गत सन 2013-14 ते 15-16 या दरम्यान सुमारे 600 लाभार्थी होते.

त्यांना 95 हजार रुपयांप्रमाणे अनुदान तीन टप्प्यात दिले जात असे. तसेच सन 2016-17 ला दोन हजार 328 लाभार्थी आहेत.

त्यांना प्रत्येकी एक लाख 20 हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येतात. सन 2016-17 ला पंतप्रधान घरकुल तर शबरी योजनेचे 445 लाभार्थी आहेत.

काल दुपारी ग्रामपंचायत सहाय्यक ऑपरेटर हे घरकुल योजनेतील चिखली गावाचे दस्तऐवज अपडेट करीत होते. पाचपैकी तीन फाईलचे काम पूर्ण झाले होते.

त्याच दरम्यान पिंप्री येथील घरकुलचे काही लाभार्थी हे कार्यालयात जावून कर्मचार्‍यास आमच्या अनुदानास किती वेळ लागणार असा प्रश्न केला असता सहाय्यक ऑपरेटर यांनी सांगितले की, साहेब बाहेर गेले आहेत ते आले का सांगतील.

मी वेळ भेटेल त्याप्रमाणे लाभार्थ्यांचे दस्तऐवज अपडेट काम करतो. असे सांगितल्यावर लाभार्थी भडकला आणि वादविवाद सुरू झाला.

अर्ध्या तासानंतर लाभार्थ्यांने पायातील पादत्राणे काढून कर्मचार्‍यास मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उभ्या असलेल्या सरपंचाने लाभार्थ्याचे हात धरून प्रकरणावर पडदा पडला आहे.

दुपारी पं.स. कार्यालयात घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा व कर्मचारी यांच्यातील गरमा-गरम चर्चा तास-दोन तास सुरूच होती.

LEAVE A REPLY

*