लातूरमध्ये सनी लिओनीचा कार्यक्रम ; पत्रकारांना धक्काबुक्की

0
लातूर / बॉलिवूडची हॉट अभिनेत्री तथा पॉर्न स्टार सनी लिओनी लातूरमध्ये एका जिमच्या उद्घाटनासाठी आली होती.
सनीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सनीनं प्रसार माध्यमांशीही संपर्क साधला, यावेळी पत्रकार प्रश्न विचारत असताना जिम संचालकाचा सचिन नावाचा सहकारी भडकला.
पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नानंतर भडकलेल्या संचालकाच्या सहकार्‍यानं पत्रकाराला धक्काबुक्की केली. यावेळी सनी लिओनीने मध्यस्थी करत शांततेचं आवाहन केलं.

तर घडल्या प्रकाराबद्दल जिमचे संचालक अविनाश चव्हाण यांनी पत्रकारांची माफी मागितली.

या घटनेचा लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला.

LEAVE A REPLY

*