लाखभर बाटल्यांचा विक्रमी टॉवर ; इगतपुरीत महिंद्रचा अनोखा उपक्रम

0

सातपूर : महिंद्राच्या इगतपुरी प्लांटद्वारे प्लास्टिकमुक्तीचा संदेश देत इगतपुरी ते नाशिक दरम्यानच्या 1 लाख प्लॅस्टिक बाटल्या जमा करून त्यामाध्यमातून जगातील प्लॅस्टिक बाटल्यांचे सर्वात मोठा टॉवर उभारुन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे अर्ज दाखल केला आहे. प्लॅस्टिकच्या वापराने होणारे त्रास सांगून लोकांमध्ये जागरूकता आणण्यासोबतच आगळा वेगळा प्रयोग करुन लोकांना प्रोत्साहीत करण्याचे काम महिंद्राच्या इगतपुरी कारखान्यातील कामगारांनी केले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही भारतातील अग्रणी एसयूव्ही उत्पादक असून, तिच्यातर्फे इगतपुरी प्लांटचे प्लॅस्टिक बॉटलरहित प्लांट असे परिवर्तन करण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत, इगतपुरी प्लांटचे कर्मचारी आणि व्यवस्थापन यांनी आपल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आणि आसपासच्या शाळा, हॉटेले आणि रेल्वे स्टेशन आदी भागातून फेकलेल्या तब्बल एक लाख प्लॅस्टिक बॉटल जमा केल्या.

महिंद्र कंपनीच्या माध्यमातून उत्पादन व नफा या बाबींचा विचार करतानाच पर्यावरण व सुरक्षा या विषयांकडे विशेष लक्ष देण्याचा कटाक्ष राहिलेला असल्याचे महिंद्राचे कांदिवली प्लांटचे उमेश जोशी यांनी सांगितले. पर्यावरणाच्या जतनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात प्रामुख्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग, घातक टाकाऊन घन कचरा, बाल कामगारांना विरोध, समान नागरी कायद्यांमद्ये लिंग भेद टाळणे आदी उपक्रम राबविले जातात.

यासोबतच सोलरचा वापर,पवनचक्कीच्या माध्यमातून वीज निर्मिती, ग्रिन बिल्डींग, वॉटर शेड डेव्हलपमेंट, या प्रकल्पावरही विशेष कार्य केले जात आहे. ग्रिन प्रकल्पांतर्गत ‘कार्बन प्रइसिंग’ अंतर्गत भारतात पहिल्यांदा महिंद्राने प्रतिटन 10 डॉलर्स खर्च करण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामाध्यमातून कार्बन टेबल स्थीर ठेवण्यात मदत मिळेल.

या प्रकल्पाची माहिती देताना शिरीष कुलकर्णी यांनी सांगितले की, महिंद्र कंपनीने प्लॅस्टिक मुक्तीचा नारा दिला आहे. त्यामुळे कंपनीत प्लॅस्टिक वापरावर बंदी करण्यात आलेली आहे. कामगारांनी हा प्रकल्प घरापर्यंत नेत एक महिन्यात एक लाख पाण्याच्या बाटल्या जमा केल्या. इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर, कसारा घाट परिसर, परिवार, शाळा, महामार्ग परिसरातून या बाटल्या जमा केल्या.

त्याचे संकलन करताना अश्याच 46 हजार बाटल्यांपासून इटलीत 16 मिटरचा टॉवर उभारल्याचा रेकॉर्ड गिनिज बुकमध्ये नोंदवलेला आहे. त्यामुळे त्यापेक्षा मोठा टॉवर उभारण्याचा निर्धार करून कामगारांनी शंभर बाटल्यांची माळ तयार करून एक लाख बाटल्यांपासून 21 मिटर उंचीचा टॉवर उभारला आहे. याबाबत गिनिज बुक रेकॉर्ड अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला आहे. लवकरच याची नोंद होईल असा विश्वास शिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*