लाईव्ह सामन्यात खेळाडूचा आत्महत्येचा प्रयत्न

0

संघात निवड न झाल्याने पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूने प्रथम श्रेणी सामना चालू असताना आत्महत्येचा प्रयत्न केला.

लाहोर क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या क्रिकेटरचं नाव गुलाम हैदर अब्बास असं आहे.

गोलंदाज असलेल्या गुलाम हैदरने लाहोर सिटी क्रिकेट असोसिएशनच्या (एलसीसीए) मैदानात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. त्यावेळी मैदानात कायदे-आजम ट्रॉफीतील सामना सुरु होता. गुलाम हैदर मैदानात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेत असल्याचं पाहताच उपस्थितांनी त्याला रोखलं.

 

LEAVE A REPLY

*