लाईव्ह कॉन्सर्टवेळी जस्टिन बिबर केवळ ‘लिप सिंक’च करत होता, चाहत्यांचा संताप

0

कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरची नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर भारतातली पहिली लाईव्ह कॉन्सर्ट झाली.

त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. पण, अनेकांचे असे म्हणणं आहे की, जस्टिनने काही गाणी गायलीच नाहीत. तो फक्त लिप सिंक करत होता.

कॉन्सर्ट चालू असतानाच काही चाहत्यांनी ट्विटरवर ही माहिती शेअर केली. केवळ लिप सिंकसाठी एवढा खर्च कशाला, असा सवालही अनेकांनी केला.

लाईव्ह शो चालू असताना बिबर मध्येच पाणी पिण्यासाठी थांबला. तेव्हाही म्युझिक चालूच होतं, असा आरोपही अनेक चाहत्यांनी केला. तर काहींनी व्यवस्थापनावरुनही कॉन्सर्टवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

*