Type to search

धुळे

लांडोर बंगला परिसरासाठी ९५ लाखांचा निधी

Share

दोंडाईचा | पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून धुळे जिल्ह्यातील प्रसिध्द लळींग किल्ला येथील लांडोर बंगला व परिसर पर्यटन दृष्टया विकसित करण्यासाठी ७५ लाखांचा निधी तर किल्ला लगत पर्यटक विश्रांतीगृह व शौचालय बांधकामासाठी २२ लाखांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी लांडोर बंगल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्यातील दलित बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांडोर बंगला व किल्ला परिसर नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. लांडोर बंगल्यात डॉ. बाबासाहेब यांचे १९३७ मध्ये तीन दिवस वास्तव्य होते. या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दर वर्षी मोठ्या संख्येने दलित बांधव या ठिकाणी एकत्र येतात. दलित बांधवांबरोबर इतर ही पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. म्हणून किल्ला व बंगला परिसरचा पर्यटन दृष्टया विकास करण्यासाठी व पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान ना. रावल यांनी या पूर्वीही लळींग किल्लाचा पर्यटन दृष्टीने विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता व वेळोवेळी या स्थळांना भेट ही दिली आहे. बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी लांडोर बंगला परिसराचा पर्यटन दृष्टया विकास होणार आहे. ऐतिहासिक स्मृती, निसर्गाचे सानिध्य आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून परिसर व मूलभूत सुविधांचा पर्यटन विकास होणार असून यातून या ऐतिहासिक स्थळावर येणार्‍या काळात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!