लहान राजमोही येथे एकास चौघांची मारहाण

0
नंदुरबार । प्रतिनिधी-अक्कलकुवा तालुक्यातील लहान राजमोही येथे उसनवारीने दिलेल्या बांधकामाच्या विटा परत मागितल्याचा राग आल्याने एकास चौघांनी बेदम मारहाण केली.
रणजित रुपसिंग पाडवी रा.लहान राजमोही ता.अक्कलकुवा याने दिलेल्या फिर्यादीनुसार, घराच्या बांधकामासाठी उसनवारीने दिलेल्या विटा परत मागितल्याचा राग आल्याने इंद्रसिंग मगन पाडवी, रमेश मगन पाडवी, युवराज व महिंद्र सर्व रा.लहान राजमोही या चौघांनी रणजित पाडवी यांच्या डोक्यावर लाकडी डेंगार्‍याने मारहाण केली.

तसेच वाईट शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*