लष्कराकडे युद्धासाठी 10 दिवसांपुरताच शस्त्रसाठा!

0
भारतीय लष्कराकडे अत्यंत कमी दारूगोळा शिल्लक असल्याचा इशारा नियंत्रक व महालेखापालने (कॅग) दिला.
कॅगच्या अहवालानुसार ,”आज युद्ध करण्याची वेळ आलीच तर लष्कराच्या भात्यातील दारूगोळा व शस्त्रे दहा दिवसही चालणार नाहीत.”
७० टक्के रणगाडे आणि ४४ टक्के तोफगोळ्यांचा साठा केवळ दहाच दिवस पुरेल, असेही अहवालात नमूद आहे. वास्तविक नियमानुसार कोणत्याही क्षणी युद्ध पेटले तर लष्कराकडे किमान ४० दिवस पुरेल एवढा दारूगोळा असला पाहिजे. मे २०१५मध्ये कॅगने भारतीय लष्कराच्या भात्यातील कमी होत चाललेल्या दारूगोळ्याबाबत सविस्तर अहवाल दिला होता.
कॅगने शुक्रवारी संसदेत हा अहवाल सादर केला. यात म्हटले आहे की, भारतीय लष्कर वापरत असलेली विविध शस्त्रे व दारूगोळ्यांचा ८० टक्के साठा ४० दिवस पुरेल इतकाही सक्षम नाही. याबाबत आपण पहिला अहवाल देऊन तीन वर्षे उलटली तरी आवश्यक दारूगोळ्याच्या साठ्याबाबत काहीही सुधारणा झाली नसल्याचे कॅगने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*