लवकरच छोट्या पडद्यावर दोन खानची टक्कर!

0

सलमान खान आणि शाहरुख खान लवकरच एकमेकांसमोर उभे राहताना दिसणार आहेत.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार शाहरुख खान टेड टॉक : नयी सोच हा टीव्ही शो तर सलमान खानचा बिग बॉस 11वा सीजन एकच वेळेसा रिलीज होणार आहेत.

या पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार किंग खानच्या नवा शो टेड टॉक: नयी सोच या शोचा प्रोमो 19 ऑगस्टला शूट करणार आहे तर सलमान खान बिग बॉस 11 चे प्रोमो शूट 30 जुलैला करणार आहे. शाहरुखचा शो रात्री 9 वाजता टेलिकास्ट होणार तर सलमानचा शो रात्री 10:30 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावर सलमानची पॉप्युलारिटी ही शाहरुख पेक्षा जास्त आहे. शाहरुखने या आधी ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘पाचवी पाससे तेज ‘ चे सूत्रसंचालन केले आहे मात्र म्हणावे तसे यश त्याच्या शो ला मिळाले नाही.

तर दुसरीकेड सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसची टीआरपी सगळ्यात जास्त आहे. ऐवढचे नाही तर सलमान लवकरच दस का दम हा शो सुद्धा छोट्या पडद्यावर पुन्हा घेऊन येणार असल्याचे समजते आहे.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते मी ऑगस्टमध्ये माझ्या शो चे शूटिंग सुरु करतो. जो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

दोन्ही स्टार्समध्ये कोण बाजी मारते हे पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागले.

LEAVE A REPLY

*