लढा रॅली

0

शहादा / भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच पक्षाच्या विविध जनसंघटनांतर्फे जागतिक कामगार दिनानिमित्त शहाद्यात लढा रॅली काढण्यात आली.

यानंतर झालेल्या लढा परिषदेत कामगारहिताचे विविध ठराव करण्यात आले.

अखिल भारतीय किसान सभा, लाल बावटा शेतमजूर युनियन व आयटक या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटनांतर्फे 1 मे रोजी कामगारदिनी शहराच्या मुख्य मार्गावरुन हातात लाल बावटा घेवून लढा रॅली काढण्यात आली.

रॅलीचे नेतृत्व माणिक सूर्यवंशी यांनी केले. कामगारांनो एक व्हा, कामगार कायद्यातील कामगारहित विरोधी बदल रद्द करा, शेतकरी, शेतमजूर, कामगार कर्मचारी संघटना एकजुटीचा विजय असो आदी घोषणा देत हजारो कामगार सहभागी झाले.

ही रॅली मुख्य मार्गावरुन तहसील कचेरीत आली. तिथे लढा परिषदेत रुपांतर करण्यात आले.

यावेळी धर्मा पवार यांनी क्रांतीगीत सादर केले. मोहन शेवाळे, ईश्वर पाटील, सिताराम माळी, विजय पाटील, द्वारकाबाई गांगुर्डे, बेबीबाई न्हावी यांनी विचार मांडले.

 

LEAVE A REPLY

*