लग्नाच्या आठ दिवस आधीच पिंपळगावच्या तरुण द्राक्ष उत्पादकाची आत्महत्या

0

पिंपळगाव बसवंत (वार्ताहर) ता. ३ : लग्न अवघ्या आठ दिवसांवर आलेले, शेतातील बंगलाही तयार होत आलेला, आई वडिल देवकार्यासाठी जेजुरीला गेलेले , अशा स्थितीत नवऱ्या मुलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

येथील रानमळा परिसरातीरल तरूण शेतकरी सागर सुदाम जाधव (खाडे) वय 23 याने आज आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

सुदाम जाधव हा तरूण काल रात्री पासून बेपत्ता होता. आज सकाळी त्याचा म्रुतदेह कादवा नदीकिनारी सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

शेती व्यवसायात अत्यंत हुशार असलेला व निर्यात क्षम द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या या तरुणाचा विवाह येत्या १४ तारखेला होणार होता.

लग्नाच्या तयारीत असलेल्या त्याच्या कुटुंबाने शुक्रवारी देवकार्याची तयारीही केली होती. त्यासाठी आई व वडील जेजुरीला नुकतेच जाऊन आले आणि संध्याकाळी असा प्रकार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आपल्या मळ्यातील वस्तीवर जवळपास पन्नास लाख रूपये खर्चून बांधलेला बंगला पूर्णत्वाकडे जात असताना सागर ने आत्महत्या का केली? याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

या प्रकरणाची पिंपळगाव बसवंत पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत

LEAVE A REPLY

*