लग्न सोहळ्यातून दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला बेड्या

0

नाशिक : लग्न समारंभांमध्ये सुरु असताना मंगल कार्यालयातून दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपी राजेंद्र जाधवला नाशकातील म्हसरुळ पोलिसांनी अटक केली आहे.

1 मार्च 2017 रोजी नाशिकमधील मेरी रस्त्यावरील औदुंबर लॉन्समध्ये विवाहसोहळा होता. लग्नाच्या दिवशी वधूच्या बॅगमधून 1 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

औदुंबर लॉन्स मधील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु असताना भद्रकाली परिसरातून राजेंद्र जाधवला पोलिसांनी केली अटक केली.

LEAVE A REPLY

*