Type to search

नंदुरबार

लग्नाच्या आहेराच्या पैशातून गरीब मुलांना वह्या वाटप

Share

चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर – लग्नाच्या आहेरच्या पैशातून बचत करत तळोदा येथील नेमसुशिल विद्यामंदिरातील शिक्षक चंद्रकांत भोई यांनी गरीब व होतकरू मुलांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करून अनोखा उपक्रम गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून राबविला. यावेळी भोई समाज तालुका अध्यक्ष शिवदास साठे, जगदीश वानखेडे, गणेश शिवदे, दशरथ वानखेडे, पुंडलिक मोरे, संतोष वानखेडे आदी उपस्थित होते.

या उपक्रमशील व समाजप्रिय शिक्षक म्हणून चंद्रकांत भोई यांचे योगदान प्रत्येक क्षेत्रात मोलाचे आहे. बेटी बचाव बेटी पढाओ, एक दिवा शहिदांसाठी, भावगती कावड पदयात्रा, गुणगौरव सोहळा, राज्यस्तरीय सामूहिक परिचय मेळावा, रांगोळी स्पर्धा, आंनद मेळावा, गणेशोत्सव विविध शिबीर अशा प्रत्येक कार्यक्रमात विशेष योगदान चंद्रकांत यांचे असते, असाच एक अनोखा उपक्रम वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करून नविन आदर्श समाजापुढे उभा केला. सदर कार्यक्रमात एकूण 250 वह्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत साठे, प्रकाश वानखेडे, मधुकर रामोळे, मिलीद पाटोळे, सचिन तावडे, अमोल वानखेडे, प्रमोद मोरे, महारु साठे,गिरीश वानखेडे, सागर ढोले, भूषण रामोळे, भूषण ढोले, नितीन भामरे, वल्या शिकलीकर, राजा शिकलीकर, महाकाल ग्रुपचे सदस्य आदींनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!