लंडनमध्ये ब्रिटिश एअरवेजच्या सर्व फेऱ्या रद्द, आयटी सिस्टिममध्ये बिघाड,

0

ब्रिटिश एअरवेज या कंपनीच्या कॉम्प्यूटर सिस्टीममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यानं सगळ्या फ्लाईट्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र ऐनवेळी या फ्लाईट्स रद्द झाल्यानं ब्रिटीश एअरवेजनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय झाली होती.

लंडनमधील दोन प्रमुख विमानतळांवरून होणारी ब्रिटीश एअरवेजची संध्याकाळी ५ पर्यंतची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती.

या प्रकरणी ब्रिटिश एअरवेजनं दिलेल्या माहितीनुसार, आयटी सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, विमान उड्डाणात अडथळे येत होते. त्यामुळे ब्रिटीश एअरलाईन्सच्या विमान सेवा काही काळाकरता बंद करण्यात आल्या होत्या.

रम्यान, हा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे ब्रिटिश एअरलाईन्सच्या किती फेऱ्या रद्द कराव्या लागल्या याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण या घटनेनंतर हीथ्रो, बेलफास्ट आणि गॅटविक टर्मिनलवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

*