लंडनमध्ये दहशतवादी हल्ला, एकाचा मृत्यू

0

शनिवारी ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत.

प्रशासनाने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू तर जवळपास 20 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

प्रसिद्ध लंडन ब्रिजवर एका भरधाव कारनं फूटपाथवरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांना चिरडलं आहे, तर दुसऱ्या घटनेत लंडन ब्रिजजवळील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीनं त्याठिकाणी खात असलेल्या ग्राहकांवर चाकूहल्ला केला आहे.

या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य एका घटनेत वॉक्सहॉल परिसरात गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

LEAVE A REPLY

*