र. ना. देशमुख महाविद्यालयाने पटकावला सलग सहाव्यांदा उमविचा क्रीडा क्षेत्रातील ‘टाॅप टेन अॅवार्ड

0
  भडगाव :  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या ‘जिमखाना डे’ च्या कार्यक्रमात भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने सलग सहाव्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील ‘टाॅप टेन अॅवाॅर्ड’ प्राप्त केला. यावर्षी महाविद्यालयाने सातवा क्रमांक पटकावला.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डाॅ.पी. पी. पाटील, कुलसचिव प्रा. डाॅ. ए.बी.चौधरी, बीसीयुडी संचालक प्रा. डाॅ. पी. पी. माहुलीकर व विद्यापीठ क्रीडा संचालक डाॅ. दिनेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
index
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महाविद्यालयांना दरवर्षी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. महाविद्यालयाने यावर्षी महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ अॅथलेटीक्स  (4×400 रिले) स्पर्धेत पदकाची हॅटट्रिक, आंतरमहाविद्यालयीन भारोत्तोलन-शक्तीतोलन-शरीरसौष्ठव स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक, आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटीक्स स्पर्धेत विजयाची तिसर्‍यांदा हॅटट्रिक, आंतरमहाविद्यालयीन योग (मुले) स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक, आंतरमहाविद्यालयीन योग (मुली) स्पर्धेत हॅटट्रिक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन भारोत्तोलन-शक्तीतोलन-शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाची हॅटट्रिक, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ शक्तीतोलन व शरीरसौष्ठव स्पर्धेत साबीर खाटीक या विद्यार्थ्याने सहभागाची हॅटट्रिक नोंदवली
तर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्राॅसकंट्री स्पर्धेत राहुल परदेशी या विद्यार्थ्याने सहभागाची हॅटट्रिक नोंदवली. महाविद्यालयाने यापूर्वी 2011-12 साली आठवा क्रमांक, 2012-13 साली आठवा क्रमांक, 2013-14 साली सातवा क्रमांक, 2014-15 साली सहावा क्रमांक व 2015-16 साली आठवा क्रमांक हे विशेष  हा पुरस्कार महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन नानासाहेब बबनराव देशमुख, प्राचार्य डाॅ. एन. एन. गायकवाड, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दिनेश तांदळे व डाॅ. अतुल देशमुख यांनी स्वीकारला.

LEAVE A REPLY

*