रोहिदास पाटील यांनी शेतकरीहिताच्या योजना राबविल्या – मधुकर गर्दे

0
धुळे । दि.13 । प्रतिनिधी-राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी धुळे पं.स.उपसभापती दिनेश भदाणे यांच्याह युवक काँग्रेसचे तालुका आणि जिल्हाध्यक्षांनी स्वत: रक्तदान करून रक्तदान चळवळीतील तरूणांना प्रोत्साहित केले.
माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी राज्यातील शेतकरी हिताच्या विविध महत्वाकांक्षी योजना दिल्या असल्याचे जि.प.सभापती मधुकर गर्दे यांनी सांगितले.

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने देवपूर धुळे येथील सुंदरसावित्री सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबीरात एकूण 89जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात जि.प.सभापती मधुकर गर्दे यांनी सांगितले की राज्यातील शेतकरी गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळाच्या संकटात सापडला आहे त्यामुळे स्वताचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय माजीमंत्री रोहिदास पाटील यांनी घेतला मात्र समाजउपयोगी उपक्रम जिल्हयात घेण्यात आले.

माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी तालुक्यात खर्‍या अर्थाने सिंचन चळवळीचा पाया रोवला.पाटबंधारे आणि कृषी मंत्री असतांना महत्वाकांक्षी योजना राबवून राज्यातील शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले त्याचा फायदा आजही शेतकर्‍यांना होत आहे.

आज राज्याच्या पातळीवर माजीमंत्री रोहिदास पाटील हेच एकमेव अभ्यासु आणि अनुभवी व्यक्तीमत्व असल्याचेही सभापती गर्दे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*