रोहिणी खडसे यांनी दिले अपघातग्रस्ताला जीवदान

0

रावेर / रावेरहून सावदयाला जात असताना वाटेत वडगाव फाटा येथे एक मजूर अपघात होऊन गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने,

जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे यांनी स्वतःच्या गाडीतून दवाखान्या पर्यंत पोहचवून जीवदान दिले.

या बाबत अधिक वृत्त असे की, आज दि 4 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जिल्हा बँक चेअरमन  रक्षाताई खडसे या बँकेच्या कामकाजासाठी रावेर तालुक्यातील दौरा आटोपून सावद्याकडे  जात होत्या.

वाटेत त्यांना  वडगाव जवळ युवराज वाघोदे हा गुरे चारणारा व्यक्तीस  एका मोटारसायकलस्वाराने उडवून दिल्याने त्याचे तोंडातून रक्त वाहत होते त्याचे नातेवाईक मदतीची याचना करत होते .

रोहिणी खडसे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्यामुळे गाडी थांबवून समवेत असलेल्या जि प सदस्य कैलास सरोदे, महेश चौधरी संतोष वाघ यांच्या मदतीने जखमी व्यक्तीला आपल्या गाडीत टाकून रावेर येथे हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सूचना केल्या.

LEAVE A REPLY

*