‘रोडीज’मध्ये संधी मिळवण्यासाठी तरुणाची अभिनेत्रीसोबत छेडछाड

0

अभिनेत्री नेहा धूपिया हिच्याबाबत घडलेली एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. याबाबतचा खुलासा खुद्द नेहानेच एका आॅनलाइन पोर्टलशी बोलताना केला आहे.

नेहाने म्हटले की, ‘मी मुंबईतील एका जॉगर्स पार्कमध्ये जॉगिंग करीत होती. तेव्हा एक मुलगा माझा सातत्याने पाठलाग करीत होता. सुरुवातीला मी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही; परंतु जेव्हा त्याने अचानक माझा हात पकडला तेव्हा मात्र मी प्रचंड घाबरली. मी लगेचच त्या मुलाला दूर सारत हात सोडवून घेतला. त्याने माझी छेड काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने हे सर्व करण्यामागचे खरे कारण सांगितले. त्याने म्हटले की, ‘मला रोडीज शोमध्ये संधी मिळवून दे’ मात्र त्याने केलेल्या या प्रकारामुळे मी प्रचंड घाबरल्याचे नेहाने सांगितले.

काही दिवसांपूर्वीच ‘रोडीज’ हा रिअ‍ॅलिटी शो संपला आहे.

परंतु त्याच्या नव्या सिजनसाठी एंट्री येणे सुरू झाले आहे. तरुणांमध्ये ‘रोडीज’ची प्रचंड क्रेझ आहे. वृत्तानुसार यावर्षी नेहा धुपिया रोडीज शोमध्ये जज करताना बघावयास मिळणार आहे. गेल्या सिजनमध्ये नेहाऐवजी रणविजय, निखिल चिनप्पा आणि प्रिन्स नरूला यांनी ‘रोडीज’च्या जजची भूमिका निभावली होती. असो, नेहाने हा घटनाक्रम सांगताना म्हटले की, ‘रोडीजमध्ये रीतसर एंट्री करणे, भाग घेणे अन् कोणाचा अशाप्रकारे छळ करून त्रास देणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

त्यामुळे मी या प्रकाराची पोलिसांत तक्रार दिल्याचेही नेहाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नुुकत्याच संपलेल्या ‘रोडीज रायझिंग’च्या किताबावर हरियाणाच्या श्वेता मेहता हिने नाव कोरले. श्वेताला विजेती म्हणून घोषित करताना एक रेनॉल्ट डस्टर कार आणि पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

‘रोडीज’ची क्रेझ तरुणाईला सुरुवातीपासूनच राहिली आहे. या शोमध्ये भाग घेण्यासाठी तरुण असे वर्तन करीत असतील तर हे गैरच म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

*