रॉयल एनफिल्ड कडून डूकाटीची खरेदी

0

आयशर मोटर्सच्या मालकीची असलेली टूव्हीलर कंपनी रॉयल एनफिल्ड इटलीची सुपरबाईक डूकाटी खरेदी करण्याच्या तयारीत असून त्यासंदर्भात दोन्ही कंपन्यांत बोलणी सुरू झाली आहेत.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

त्यानुसार फॉक्सवॅगनला उर्त्सजन नियमभंगाबद्दल कारवाईला सामोरे जावे लागल्याने त्यांनी डूकाटी विकण्याचा विचार चालविला आहे.

या कायदेशीर बाबींमुळे फॉक्सवॅगन अडचणीत आली असताना दुसरीकडे एनफिल्ड त्यांच्या विस्तारासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. डूकाटीच्या खरेदीतून एनफिल्डला त्यांची जागतिक बाजारावरील पकड मजबूत करायची आहे.

एनफिल्डच्या बाईक्सना देशविदेशातून भरपूर मागणी आहे मात्र त्यांच्याकडे सध्या ८०० ते १२०० सीसी क्षमतेच्या सेगमेंटमधील बाईक नाही, डूकाटी त्यांची ही गरज पूर्ण करू शकणार आहे व या सेगमेंटमध्येही पकड मिळविण्यासाठी दुकातीचा मोठा उपयोग होणार आहे.

डूकाटीची मार्केट व्हॅल्यू १०५०० कोटींची आहे व एनफिल्डसाठी हा चांगला सौदा आहे.

LEAVE A REPLY

*