रॉकेलची तस्करी करताना एकाला रंगेहाथ पकडले

0
वेळूंजे(त्र्यं) : वेळूंजे येथील हेदुलीपाडा येथे काल  दुपार च्या सुमारास ७० लिटर रॉकेल  बाहेर गावी नेऊन विकणाऱ्याला स्थानिकांनीआज पकडून दिले.
तारकेश्वर भिकाराम गुप्ता हा  इसम एम.एच.१५. ए. आर.०१३५ या हिरोहोंडा गाडी घेऊन नाशिक येथून वेळूंजेपैकी हेदुलीपाडा येथील रॉकेल दुकानदार मंगळु भुरबुडे यांच्याकडून काळाबाजार करून रॉकेल खरेदी करून बाजारात हमीभावाच्या पाच पट किंमतीने विकत होता.
स्थानिकांनी त्या इसमाला विचारले असता मी पोती विकत घेतो व आजही पोती घेण्यासाठी आल्याचे सांगितले व तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
पण माजी सरपंच इंदुकांत  हागोटे यांच्या लक्षात हा सगळा प्रकार आल्यानंतर गाडी पकडली. गाडीच्या दोन्ही बाजूला रॉकेलचे ड्रम  व गाडीच्या शीटवर रिकामे पोते बांधले असल्याचे निदर्शनास आले.  ७०लिटर रॉकेल रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तहसीलदार महेंद्र पवार व पोलीस उपनिरीक्षक चौधरी तसेच कॉन्स्टेबल बापू आहेर यांना बोलावून पंचनामा करण्यात आला असून संबंधित दुकानदारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*