रेशीम रथाला नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा

0

नाशिक : महाराष्ट्र शासन रेशीम रथाला नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन यांनी हिरवा झेंडा दाखवला. महाराष्ट्र रेशीम संचालनालय नागपूर यांच्या अंर्तगत राबविण्यात येणाऱ्या रेशीम व्यवसायात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय म्हणून करावे. यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेशीम रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

हा रथ 25 मार्च पर्यंत निफाड, येवला, दिंडोरी, नाशिक या चार तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन तेथील कमीत कमी दहा ईच्छुक शेतकऱ्यांना भेटणार आहेत. या जोड धंद्यासाठी शासण आपल्याला कशी मदत करणार याचे मार्गदर्शन करणार आहेत.

नाव नोंदणी करून घेणार व्यवसायबद्द्ल मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा रेशीम आधिकारी विजय फुले या  प्रकल्पात समाविष्ट व विशेष सहकार्य बार्टी प्रशिक्षण संस्था पुणे समता दूत श्रीकांत आहेर सायक प्रकल्प संचालक, भिमराव चव्हाण नाशिक तालुका समता दूत, दिंडोरी सुनिल पागे, निफाड मंगला गायकवाड , येवला सिध्दोधन तायडे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*