रेशनचा माल उचलण्याकडे कानाडोळा

0

शहरातील 90 रेशन दुकानदारांना नोटीसा

अहमदनगर (प्रतिनिधी)– संपात सहभागी झाल्याने शहरातील गरीबांना रेशनपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गरीबांना रेशन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कारवाईचा दंडुका हाती घेतला असून 90 रेशनदुकानदारांना कारणे दाखवा नोटीसा पाठविल्या आहेत.
ऑगस्ट महिन्यातील धान्य उचलण्यासाठी चलन भरणे आवश्यक असताना ते न भरता रेशन दूकानदार संपात सहभागी झाले. त्यामुळे लाभार्थीना वितरीत करण्याचे धान्यापासून गोदामात पडून आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नूसार व जीवानांश्यक वस्तु कायदा 1955 तसेच महाराष्ट्र अनुसूचित वस्तु वितरणाचा नियम 1975 नुसार जिल्हा पुरवठा विभागाने रेशनदुकानदारांविरोधात कारवाईचा दंडुका हाती घेतला आहे. त्याअंतर्गत नोटीसा पाठवून त्यांच्याकडून धान्य का उचलले नाही याचा खुलासा मागविला आहे.

  दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्टपासून संप पुकारला आहे. सध्या जुलै महिन्यातील माल वाटप सुरु आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यातील माल भरण्यासाठी 10 ऑगस्टपर्यत चलन भरणे अपेक्षित असताना नगर शहरतील 90 दूकानदारांनी चलन भरलेले नाही.

LEAVE A REPLY

*