Type to search

जळगाव

रेल्वे प्रशासनाकडून डिजिटल इंडियाला फाटा

Share

जळगाव । देशभरात आर्थीक व्यवहार कॅशलेश करण्यासाठी शॉपींग मॉल, रेल्वे, एसटीबसेस आदी ठिकाणी भिम अ‍ॅपसह इतर अ‍ॅपचा पर्याय वापरावर भर दिला जात आहे. त्यानुसार अत्याधुनिक तंत्रप्रणाली सेवेसाठी दाखल असताना तांत्रीक कारण सांगून रेल्वे प्रवाशांची अडवणूक करण्याचे धोरणाचा रेल्वे प्रशासनाकडून अवलंब केला जात आहे. त्यामूळे पंतप्रधान मोदींचे ‘डिजीटल इंडिया’ला फाटा दिला जात आहे.   गेल्या दोन तीन वर्षांपासून देशभरात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यात आली आहे.

दैनंदिन आर्थीक व्यवहार करण्यासाठी बॅकांमधे लांबच लांब रांगांमधे उभे न रहाता मोबाईलव्दारा ई-वॉेलेटमधून पैसे ट्रान्सफर करणे, स्वस्त धान्य दुकानावर रेशनमाल घेण्यासाठी इॅपॉज मशीन, शॉपींग मॉलमधे दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासह बसेसमधे तिकीट काढण्यापासून ते आरक्षण घेण्यासाठी इॅ वॉलेट,भिम अ‍ॅप, इ तिकीट वेंडींग मशीन असे आधुनिक तंत्र प्रणाली सर्वच ठिकाणी अस्तीत्वात आहे. मोठया जंक्शन स्थानकांवर देखिल रोख कॅश ऐवजी कार्ड स्वाईप करून रेल्वे प्रवासाचे तिकीट मिळवता येते.

तसेच घरबसल्या ऑनलाईन  इच्छित प्रवासाचे तिकीट मोबाईल अ‍ॅपवरुन देखील या सुविधेव्दारे मिळविता येते. परंतु जळगाव जंक्शन स्थानकावर मात्र मासिक रेल्वे तिकीट काढण्यासाठी तांत्रीक कारण पुढे करून जवळच असलेल्या एटीएम मधून पैसे काढा व नंतर सिझन तिकीट घ्या असा अजब सल्ला संबधित कर्मचार्‍याकडून देण्यात आला. हा प्रकार एक दोन वेळा नव्हे चक्क चार पाच वेळा अनुभवास आल्यानंतर संबधित मासिक सिझन तिकीट धारकाने देखिल वैतागून  कार्ड स्वाईप करण्याऐवजी एटीएम मधून पैस काढून इच्छित मासिक सिझन तिकीट खरेदी केले.

संबधित कर्मचार्‍यांना कार्ड स्वाईप करण्याची प्रक्रिया अवगत नसावी. त्यामुळे त्यांनी आपले अज्ञान प्रगत होवू नये म्हणून स्वाईप मशीन बंद असल्याचे सांगीतले. यासदंर्भात ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात आली. चाळीसगाव तसेच जळगाव रेल्वे स्थानकावर दोन ठिकाणच्या काउंटरवर स्वाईप कार्ड करण्याची सुविधा आहे.तसेच चाळीसगाव येथे एक स्वाइप मशीनची तक्रार आहे ती दुरूस्त केली जाईल. असे ऑनलाईनवर उत्तर मिळाले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!