रेल्वेतून कबूतरांची तस्करी, पाचजण ताब्यात

0
नंदुरबार । ताप्तीगंगा एक्सप्रेसमधून उच्च जातीचे कबुतरे घेवून जाणार्‍या पाच संशयीतांना नंदुरबार लोहमार्ग पोलीसांच्या पथकाने सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत वनविभागाकडून संशयीतांची चौकशी करण्याची कार्यवाही सुरू होती.

संशयीत आरोपी मोहम्मद फजल अन्सारी (60) , मोहम्मद इरफान (45), मोहम्मद सईद कुरेशी (40), मोहम्मद रफीक अहमद मन्सुरी (35), फरकान शेख (25) सर्व राहणार सुरत यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान ताप्तीगंगा एक्यप्रेसमून आरोपी 9 विविध पिंजार्‍यांमध्ये उच्च जातीच्या कबुतरांना घेवून जात असल्याची माहिती मिळाली. यात साधारणत दोन लाख किंमतीचे 400 कबुतर असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान संशयीतांकडून प्राथमिक माहिती घेतली असता कबुतर पाळण्याची आवड असल्याने ते सुरत येथे घेवून जात असल्याचे संशयीतांकडून सांगण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीसांनी वनविभागाला याबाबत माहिती कळवल्यावर वनविभागाचे वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, वनपाल संजय पाटील व वनसंरक्षक कल्पेश अहिरे यांनी आरोपींची चौकशी करीत कबुतरांची पाहणी केली. दरम्यान, अनेक वेळा सट्टा खेळण्यासाठी तसेच जुगारासाठीही कबुतरांचा वापर करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे यामागे मोठी टोळी आहे काय, नेमके कबुतर कोठून आणले. याबाबत वनविभागाकडून चौकशी करण्यो तयेत आहे. दरम्यान, लोहमार्ग पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकात एपीएस विकास थोरात, एएसआय जी.एच.काळे, योगेंद्र मोरे, पुरूषोत्तम खेराटकर, राजेंद्र घोराडे, विवेकानंद माळी इतर कर्मचार्‍यांच्या समावेश होता. वनविभागाकडून रात्री उशिरापर्य।त आरोपींची चौकशी व पुढभ्ल कार्यवाही करण्याठत येत होती.

LEAVE A REPLY

*