रेल्वेतील घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा

0

लालू प्रसाद यादव यांच्या जवळपास 12 मालमत्तांवर सीबीआयने आज (शुक्रवारी) एकाच वेळी छापेमारी केली.

दिल्ली, रांची, पुरी, पाटणा, गुरुग्राम यासारख्या मालमत्तांचा यात समावेश आहे.

लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वीसह तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, आयआरसीटीसी, खासगी कंपनीचे दोन संचालक, खासगी मार्केटिंग कंपनी आणि काही अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हॉटेलचा विकास करणे, देखभाल-दुरुस्ती करणे आणि चालवण्याचे कंत्राट या कंपनीला देण्यात आले होते. या व्यवहाराच्या मोबदल्यात संबंधीत कंपनीने पाटणा येथे दोन एकरची जागा लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधीत कंपनीच्या नावावर केली होती. या संशयास्पद व्यवहाराचा सीबीआयकडून तपास सुरु होता.

लालूप्रसाद यादव 2006 साली रेल्वेमंत्रीपदी रुजू झाले होते. रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरीमधल्या हॉटेल्सना निविदा देताना केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

 

LEAVE A REPLY

*