रेल्वेच्या वायरमनचा शॉक लागून मृत्यू

0
जळगाव । दि.12। प्रतिनिधी-रेल्वे मालधक्काजवळील हायमस्ट लॅम्पची दुरुस्ती करीत असतांना रेल्वे वायरमनचा शॉक लागुन मृत्यू झाला. ही घटना दुपारी 4.20 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे मालधक्काजवळील गुड्स विभागाजवळील दोन केबल नादुरुस्त होत्या.
ती दुरुस्त करण्यासाठी इंजिनीअर अरविंद कुमार, वायरमन मनोज बापुराव पाटील (वय 25), युवराज दयायाराम गिरणारे, हेल्पर योगेश शांताराम पाटील हे गेले.
दोघं केबलपैकी एक वायर दुरुस्त करुन विद्युत कर्मचारी हायमस्ट लॅम्पजवळ आले. हायमस्ट लॅम्पची दुरुस्ती करण्यापुर्वी मेन लाईट बंद करण्यात आली.
सेफ्टी साहित्यासह मनोज पाटील यांच्यासह युवराज गिरणारे यांनी हायमस्ट लॅम्पजवळील वायरचे इन्सुलशन काढले. याचवेळी विद्युत प्रवाह रिटर्न होवून शॉक लागीत मनोज पाटील चिकटून गेले.

प्लॅस्टीकची काठी मारुन कर्मचार्‍यांनी त्यांना सोडविले. बेशुध्द अवस्थेत मनोज पाटील यांना इंडो अमेरिकन हॉस्पीटल येथे घेवुन गेले

. याठिकाणी वैद्यकिय अधिकार्‍यांनी मनोज पाटील यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले. यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणले.

मनोजची वडिलांच्या जागी नियुक्ती
मनोज पाटील यांचे वडील बापुराव पाटील हे रेल्वेमध्ये विद्युत विभागात कामाला होते. स्वेच्छानिवृत्त घेतल्यानंतर वडीलांच्या जागी मनोज एक वर्षापुर्वी लागले होते. मनोजने ईलेक्ट्रीकल्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. त्याचा लहान भाऊ संदीप यांनीही मेकेनिकलमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण करून पुणे येथे ते खासगी कंपनीत कार्यरत आहेत.

नातेवाईंकाचा आक्रोश
मनोज पाटील हे कुटूंबीयांसह दुध फेडरेशनजवळील रेल्वे क्वार्टर येथे राहतात. मनोजच्या मृत्यूची बातमी कळताच संपुर्ण वसाहतमध्ये नागरीकांनी हळहळ व्यक्त केली. तसेच रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. रेल्वेचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी मयताच्या कुटूंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

LEAVE A REPLY

*