रेल्वेखाली तरूणीची आत्महत्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका तरुणीने रेल्वेखाली आत्महत्या केली. आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आत्महत्या आहे की घातपात याची चौकशी सुरु केली आहे. नाजूक प्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक तरुणी रेल्वे रुळाच्या जवळ उभी होती. रेल्वे आल्यानंतर ती रुळावर उभी राहीली. मोबाईल फोनवरुन ती अज्ञात व्यक्तीशी बोलत तिने आत्महत्या केली. हा प्रकार एका महिलेने पहिल्यानंतर तिने आरडाओरड केला. मात्र काही क्षणात तरूणीच्या अंगावरून रेल्वे भरधाव निघून गेली. हा प्रकार स्थानिक नागरिकांनीही पाहीला. प्रत्यक्षदर्शींनी पोलीस ठाण्यात यासदंर्भात माहिती दिली. नगरचे सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे व तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुलीच्या हातातील मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही. हा प्रकार नाजुक कारणातुन झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ही तरूणी केडगाव, शिवाजीनगर किंवा नगर तालुक्यातील असल्याचा संशय असून तिची ओळख पटलेली नाही.

 

LEAVE A REPLY

*