रेडिओ जॉकीची आत्महत्येप्रकरणी आर्मी मेजर पतीला अटक

0

हैदाराबादमधील आरजे (रेडिओ जॉकी) संध्या सिंह यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत बोलारममधील आर्मीच्या क्वॉर्टर्समध्येच आढळला होता.

संध्या सिंह यांच्या आत्महत्येप्रकरणी आर्मीमध्ये मेजर असलेले पती वैभव विशाल यांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

18 एप्रिलला 30 वर्षीय मेजर वैभव विशाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

वैभव विशाल यांचं पोस्टिंग आर्मीच्या सिकंदराबादेतील 54 व्या इन्फंट्री डिव्हिजनमध्ये करण्यात आलं होतं.

कलम 304 ब (हुंडाबळी मृत्यू) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या सिंह यांची बहीण उमाने गाझियाबादमध्ये तक्रार दाखल केली होती.

LEAVE A REPLY

*