Type to search

आरोग्यदूत

रुट कॅनलबद्दल गैरसमज दूर करा

Share

दात कितपत कळला आहे त्यावरून त्यावरील उपचार ठरतात. त्यामुळे दात किडला की प्रत्येक वेळी ‘रुट कॅनल’च करावे लागते असे नाही; पण दाताची कीड त्याच्या आतल्या संवेदनाक्षम भागापर्यंत पोहोचून असह्य ठणका लागतो तेव्हा मात्र रुट कॅनल उपचाराने दात वाचवणे शक्य आहे किंवा दाताच्या आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या पल्पला काही कारणामुळे इजा पोहोचल्यास दंततज्ञ रुट कॅनल उपचार पद्धतीचा सल्ला देतात.

रुट कॅनल उपचारांबाबत असलेल्या गैरसमजामुळे अनेक लोक हे उपचार करणे टाळतात. यासाठी रुट कॅनलविषयी ही माहिती जरूर वाचा.

1) रुट कॅनलऐवजी दात मुळापासून काढून घेतले तर काय योग्य होईल?
– मुळीच नाही.
एक दात काढून टाकल्याने समस्या कमी होत नाही. आपल्या शरीरात दातांचे महात्म्य खूप अनमोल आहे. खोट्या दातासोबत नैसर्गिक दातांची तुलना होऊ शकत नाही. दात काढल्याने त्याच्या आजूबाजूचे दात खिळखिळे होतात. हिरड्यांच्या समस्या निर्माण होतात व अन्न चावणे कठीण होते. कालांतराने पोटाचे विकार निर्माण होतात.

2) रुट कॅनल ट्रिटमेंट खूप वेदनादायक असते काय?
प्रत्येक दाताच्या तसेच दाढीचे तीन भाग / थर असतात. यातला सर्वात बाहेरील अत्यंत कठीण थर म्हणजे ‘इनॅमल’ आणि इनॅमलच्या आतील थर म्हणजे ‘डेंटिन’ आणि त्याच्याही आत म्हणजे ‘पल्प’. या पल्पच्या भागात नसा, रक्तवाहिन्या आणि पेशी असतात. हा पल्पचा भाग दाताला संवेदना देतो आणि अन्नपुरवठाही करतो. दाताच्या मुळामध्ये असलेली ‘कॅनल’सदृश पोकळी ज्याच्यात वर सांगितलेला ‘पल्प’चा भागही हजर असतो. ते म्हणजे ‘रुट कॅनल’
दाताच्या संवेदनाक्षम पल्पला जेव्हा किळ पोहोचते तेव्हा वेदना होतात. तेव्हा नुसते ‘फिलिंग’ करून होत नाही. त्याला ‘रुट कॅनल ट्रिटमेंट’ आरसीटी इलाज करावा लागतो. हे उपचार करतांना आधुनिक पद्धतीमुळे भूल दिल्यामुळे दाताला निर्जिव करतात. त्यामुळे वेदना होत नाहीत.

3) रुट कॅनल ट्रिटमेंट कधी करता येत नाही?
दात खूपच हलत असेल तेव्हा किडलेला दात खूपच तुटला असेल तेव्हा. जेव्हा आरसीटी करूनही त्याच्यावर जर कॅप बसवता येत नाही तेव्हा. खूपच हिरड्यांचा विकार असेल तेव्हा.

4) आरसीटी चे (साईड इफेक्टस्) धोके काय?
– रुट कॅनल ट्रिटमेंट उपचारात कुठलाही धोका नसतो. डोळ्यांवर परिराम होतो हे गैरसमज आहेत. अगदी गर्भवती महिलांमध्ये योग्य ती काळजी घेऊन व रुग्णाचे पूर्ण सहकार्य लाभल्यास आरसीटी करून दात, दाढ वाचवता येते.

5) काय काळजी घ्यावी लागते आरसीटीनंतर?- रुट कॅनल उपचार झाल्यानंतर दातावर कॅप बसवावी लागते. हे न केल्यास काही दिवसांनी दात व दाढ तुटून जाते. कॅपमुळे दात, दाढला पूर्ववत ताकद प्राप्त होऊन ती तोंडात दीर्घकाळ टिकून राहू शकते.
डॉ. रुपल अग्रवाल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!