Type to search

क्रीडा

रुटच्या शतकामुळे इंग्लंडकडे 448 धावांची भक्कम आघाडी

Share
सेंट लुसिया । इंग्लंड आणि विंडीज संघामध्ये सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडने तिसर्‍या दिवशी 448 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. पहिल्या 2 कसोटीत साहेबांना मानहानीकारक हार पत्करावी लागल्याने 3 सामन्यांची कसोटी मालिका गमवावी लागली. त्यामुळे अखेरच्या सामन्यात विजय मिळवून झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी इंग्लंडचा संघ जीवाचे रान करील हे मात्र नक्की.

सामन्याच्या तीसर्‍या दिवसअखेर इंग्लंडने 4 गडी गमावत 325 धावा केल्या आहेत. यात कर्णधार जो रुटने नाबाद 111 धावांची शतकी खेळी केली. तसेच जो डेनली 69 आणि जोस बटलरने 56 धावांची अर्धशतकी खेळी करत कर्णधाराला चांगली साथ दिली.

पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने 277 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात मैदानात आलेला विंडीजचा संघ 154 धावांवर गारद झाल्याने इंग्लंडला दुसर्‍या डावाआगोदर 123 धावांची आघाडी मिळाली होती. त्यात आता 325 धावा जमा झाल्याने इंग्लंडकडे 448 धावांची मोठी आघाडी आहे. हा सामना डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

इंग्लंडच्या जो रूटनं विराटला मागे टाकलं
वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या 2 टेस्ट गमावल्यानंतर तिसर्‍या टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. कर्णधार जो रूटच्या शतकाच्या मदतीनं इंग्लंड तिसर्‍या टेस्टमध्ये मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं त्यांच्या दुसर्‍या इनिंगमध्ये 3254 एवढा स्कोअर केला होता. आता इंग्लंडकडे 448 रनची आघाडी आहे. इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 277 रन केले होते. यानंतर बॅटिंगला आलेल्या वेस्टइंडिजला 154 रनपर्यंतच मजल मारता आली.

या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला तरी त्यांनी सीरिज आधीच गमावली आहे.

जोर रूटनं त्याच्या शतकी खेळीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं आहे. जो रूटनं 80 टेस्टच्या 147 इनिंगमध्ये 6,674 रन केल्या आहेत. तर विराटनं 77 टेस्टच्या 131 इनिंगमध्ये 6,613 रन केल्या आहेत. रनच्या बाबतीत विराट कोहली जो रुटच्या मागे पडला असला, तरी शतकांच्याबाबतीत मात्र विराट बराच पुढे आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर 25 शतकं आणि जो रूटच्या नावावर 16 शतकं आहेत. टेस्टमध्ये विराटची सरासरी 53.76 आणि जो रूटची सरासरी 49.80 आहे. अर्धशतकांच्याबाबतीत जो रूट विराटच्या बराच पुढे आहे. रूटनं आत्तापर्यंत 41 अर्धशतकं तर विराटनं 20 अर्धशतकं केली आहेत.

वेस्टइंडिजविरुद्ध 123 रनची आघाडी घेणार्‍या इंग्लंडनं तिसर्‍या दिवसाची सुरुवात 190 अशी केली होती. तिसर्‍या दिवशी इंग्लंडनं फक्त 4 विकेट गमावल्या.

रोरी बर्न्सच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का लागला. कीमो पॉलनं बर्न्सची विकेट घेतली. पायाला दुखापत झाल्यामुळे कीमो पॉलला मैदान सोडावं लागलं. किटन जेनिंग्स 23 रनवर जोसेफचा शिकार झाला. पहिल्या 2 विकेट गेल्यानंतर जो रूटनं इंग्लंडची खेळी सावरली. रूट सध्या 209 बॉलमध्ये 111 रनवर नाबाद खेळत आहे. रूटच्या या खेळीमध्ये 9 फोरचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!