रुईखेड येथील अत्याचाराच्या घटनेप्रकरणी कारवाईची मागणी

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी- बुलढाणा जिल्ह्यातीलल रुईखेड मायआंबे या गावातील मागासवर्गीय महिलेवर अतिशय क्रुरपणे आत्याचार करण्यात आले होते.
यातील आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमेटी ग्रामीणतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

रुईखेड येथील मायआंबे येथे महिलेवर झालेल्या अत्याचाराची घटना ही समाजाला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.

तसेच पिडीत महिलेस शासकीय मदत करुन तीला दैनंदिन उदरनिर्वाह करण्यास मदत करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच घटना होवून 15 दिवस उलटले तरी अद्यप देखील समाज कल्याण मंत्री ना. बडोले, महिला व बालविकास मंत्री ना. पंकजा मुंडे, केंद्रीय समाज कल्याण मंत्री ना. रामदास आठवले यांनी अद्यापही घटनास्थळी भेट दिलेली नसल्याने त्यांचा पत्राद्वारे निषेध करण्यात आला.

तसेच सत्ताधिकार्‍यांनी राजीनामे देण्याची देखील मागणी त्यानी यावेळी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल मोरे, मनोज सोनवणे, प्रदिप सोनवणे, जगदिश गाढे, ज्ञानेश्वर कोळी, विवेक नरवाडे, जुलाल गायकवाड, भगवान मेढे, विलास खरात, प्रकाश मोरे, कल्पना सपकाळे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*