रिलायन्स जिओची उपकंपनी असल्याचे भासवून फसवणूक ; जिओकडून गुन्हा दाखल

0

 नाशिक : रिलायन्स जिओ ची सहयोगी कंपनी असल्याचे भासवून तसेच बनावट संकेतस्थळ तयार करून त्याद्वारे मोबाईल टॉवर उभारणीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी मोबाईल टॉवर इंडिया लिमिटेड या बंगलोर स्थित बनावट कंपनी विरुद्ध रिलायंन्स जिओतर्फे सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली.

मोबाईल टॉवर इंडिया लिमिटेड हि बनावट कंपनी कडून www.reliancejiotower.com या बनावट संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी रिलायंन्स जिओ चा कंपनी लोगो तसेच इतर माहितीचा वापर करण्यात आला. मोबाईल टॉवर च्या भाड्यापोटी मोठ्या रकमेचे आमिष दाखवून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या घराच्या किंवा इतर स्थावर मालमत्तेच्या मोकळ्या जागेत कंपनीतर्फे टॉवर उंभारून त्यापोटी भरभक्कम भाडे दिले जाईल असे या बनावट कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर सदर कंपनी करारनामा तसेच इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून पैसे उकळत आहे. कॅनडा कॉर्नर येथील रहिवासी श्री. राहुल शशिकांत लोणे यांना याप्रकारे जाळ्यात गोवण्यात आले. औपचारिकता पूर्ण करण्याकरिता पैशाची मागणी केली असता त्यांनी रिलायंन्स जिओ च्या नाशिक येथील कार्यालयाशी संपर्क साधला. कंपनीतर्फे कागदपत्रांची तपासणी केली असता हा सर्व प्रकार लक्षात आला. कंपनीच्या वतीने तात्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

सदर कंपनीचा रिलायन्स जिओ शी कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक संबंध नसल्याचे यावेळी जिओची वतीने सांगण्यात आले. त्याचप्रमाणे टॉवर संबंधित व्यवहार करताना जिओ कोणत्याही ग्राहक कडून कोणत्याही स्वरूपात पैशाची मागणी करण्यात नसल्याचे जिओ च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. असे प्रकार आढळून आल्यास त्वरित कंपनीच्या निदर्शनास आणून फसवणूक टाळण्याचे आवाहन रिलायंन्स जिओ च्या वतीने करण्यात आले.

काही शहरांमध्ये मोबाईल टॉवर साठी जाहिराती देऊन नाग्रिकांची फसवणूक करण्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. सोशल मीडिया वर दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले. ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करून कंपनीचे नुकसान करण्याचा प्रयत्न काही व्यक्ती हेतुपुरस्पर करत असून कंपनी संबंधित व्यक्ती आणि प्रवृत्तीविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे यावेळी कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अधिक तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

*