Type to search

जळगाव

रिधूरवाडा पुलाचे आ.भोळेंच्या हस्ते भूमिपूजन

Share

जळगाव । येथील कांचननगर लगतच्या रिधूरवाडा पुलाचे भूमिपूजन 19 रोजी आ. राजुमामा भोळे, आ. चंदूलाल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या 25 कोटीतून हे 25 लाखांचे काम होत आहे.

यावेळी स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, सभापती जितेंद्र मराठे, नगरसेवक चेतन सनकत, नगरसेविका भारती सोनवणे, नगरसेवक भगत बालाणी, नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, नगरसेवक सुनील खडके, माजी नगरसेवक किशोर चौधरी, चेतना किशोर चौधरी, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, संजय चौधरी, मक्तेदार राहुल धांडे व इतर आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

25 लाखांचे काम 15 दिवसात
रिधूरवाडा ते कांचननगरला जोडणारा हा पूल आहे. 100 मीटर अंतराचा हा पूल असून 25 लाखाचे हे इस्टिमेट आहे. पुलाचे काम 15 दिवसात पूर्ण करण्यात येईल असे मनपा स्वीकृत सदस्य कैलास सोनवणे यांनी यावेळी सांगितले. या पुलाच्या कामी कैलास सोनवणेंसह नगरसेवक चेतन सनकत, नगरसेविका भारती सोनवणे आदी प्रयत्नशील होते.

गेल्या अनेक दिवसांपासून रिधूरवाडा ते कांचननगरला जोडला जाणारा हा छोटासा पूल पडलेला होता. त्यामुळे हा पूल वापरात नव्हता. यास लागून काही अंतरावरुन जुना असोदा रोड आहे. या रस्त्यावरुनच वाहतूक सुरू होती. पुल नसल्याने कांचननगर ते रिधुरवाडा असे येणे जाणे बंद झाले होते. फिरून जावे लागत होते. आता मात्र या पुलाचे भूमिपूजन झाले असून 15 दिवसात काम होणार असल्याचे कैलास सोनवणे, मक्तेदार राहुल धांडे यानी यावेळी सांगितले. 15 दिवस ते तीन आठवड्यात हा पूल तयार होईल व लवकरच वाहतुकीस मोकळा करण्यात येईल, असेही कैलास सोनवणे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!