‘रिचफिल्ड’चा ‘स्कॉच’ पुरस्काराचे सन्मान

0

नाशिक : ऑर्गेनिक खतांमध्ये व फर्टिगेशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या रिचफिल्ड फर्टिलायझर्स प्रा. लि. कंपनीला स्कॉच फाऊंडेशनतर्फे सर्वोच्च अशा ‘प्लॅटीनम स्कॉच एव्हग्नीन अ‍ॅवॉडॅ’ने सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रात अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणारी रिचफिल्ड फर्टिलायझर्स पहिली ठरली आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रिचफिल्डचे चेअरमन डॉ. स्वप्निल बच्छाव यांनी हा पुरस्कार स्विकारला. अशी माहिती वनाधिपती विनायकदादा पाटील, डॉ. स्वप्निल बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्कॉच फाऊंडेशन 1997 पासून दिल्ली (गुरगांव) येथे कार्यरत असून कृषी, अर्थ, वित्त, व्यवस्थापन, तंत्र, शिक्षण, आरोग्य, सरकारी व खासगी क्षेत्रात योगदान देणार्‍या संस्था किंवा व्यक्तींना असे प्रकारचे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. फर्टिगेशन हे तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम आणून त्याचा विकास करून शेतकर्‍यांपर्यंत पोहचवणे व त्याद्वारे शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणे या पायाभूत कामाची दखल घेत रिचफिल्ड हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्काराविषयी बोलतांना डॉ. बच्छाव म्हणाले, कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणून उत्पादकतेमध्ये निर्यात व वृद्धीमध्ये केलेल्या कामाची पावती या पुरस्काराच्या रुपाने मिळाली आहे. फर्टिगेशनच्या क्षेत्रात काम करणार्‍या रिचफिल्डच्या टिमचे यात मोलाचे योगदान आहे. यापुढेही शेती आणि शेतकर्‍याच्या उन्नतीसाठी काम करण्यास कट्टीबद्द असल्याचे त्यांनी सांगीतले.

यापूर्वी फर्टिगेशनच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेवून 2003 साली ‘रिचफिल्ड’ला कै. वसंतराव नाईक स्मृति प्रतिष्ठानतर्फे ‘कृषीशास्त्रज्ञ’ म्हणून गौरवण्यात आले आहे. तसेच तंत्रज्ञान व उद्योग यांची यशस्वी सांगड घातल्यामुळे 2005 ला भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयातर्फेे ‘राष्ट्रीय उद्योग सन्मान पुरस्कार’ देवून गौरवण्यात आले.

तसेच 2006 साली महाराष्ट्र शासनातर्फे ‘उदयान पंडित’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय डॉ. बच्छाव यांना नुकताच ‘मराठा बिझनेस एक्सलंस अ‍ॅवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*