राहुल गांधींचे याहामोगी मातेला साकडे

0

नंदुरबार /काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी काल दि. 2 रोजी गुजरात राज्यातील सागबारा तालुक्यातील देवमोगरा येथील याहामोगी मातेचे दर्शन घेवून गुजरात विधानसभेत काँग्रेस यश मिळावे यासाठी साकडे घातले.

याहामोगी हे आदिवासी बांधवांचे कुलदैवत असून महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर शेकडो गावे आदिवासीबहुल वस्तीची आहेत.

गुजरात राज्यात सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूका होवू घातल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी काल गुजरात राज्यातील डेडीयापाडा परिसरात भेट देवून निवडणूकीचे रणशिंग फुंकले.

यावेळी तेथे त्यांनी विराट सभादेखील घेतली. सध्या काँग्रेस पक्षाला सर्वत्र मिळत असलेल्या पराभवापासून पक्ष बाहेर यावा यासाठी श्री.गांधी यांनी तयारी सुरु केलेली दिसते.

गुजरात राज्यातील निवडणूकांमध्ये यश मिळावे यासाठी त्यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

म्हणूनच की काय याहामोगी मातेचे देवस्थान डेडीयापाडा गावापासून अगदी जवळ असल्याने तसेच आदिवासींचे श्रद्धास्थान असल्याने राहूल गांधी यांनी देवमोगरा याठिकाणी भेट दिली.

तेथे याहामोगी मातेचे दर्शन घेवून पुजाअर्चादेखील केली व काँग्रेस पक्षाला गुजरात राज्यातील विधानसभा निवडणूकीत यश मिळावे यासाठी मातेला साकडे घातले. याशिवाय आदिवासींचे पारंपारिक वाद्य ढोल वाजवून निवडणूकीचा नगारा वाजवला.

LEAVE A REPLY

*