राहाता ः 353 शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरसाठी सोडत

0

तक्रारींमुळे औजारांचा सोडत मंगळवारी

 

राहाता (तालुका प्रतिनिधी)- उन्नत शेती समृध्दी अभियाना अंतर्गत राहाता कृषी विभागाच्या वतीने 353 लाभार्थी शेतकर्‍यांची ट्रॅक्टर साठी लकी ड्रॉ काढून सोडत काढण्यात आली.

 

दरम्यान, औजारांसाठी ड्रा काढण्यात येणार होता. पण चिठ्या कमी असल्याचा संशय आल्याने काही शेतकर्‍यांनी याबाबत तक्रारी केल्या. त्यानंतर त्यात तथ्य आढळून आल्याने हा ड्रॉ स्थगित करण्यात येऊन मंगळवारी घेण्याचे ठरले.

 

राहाता जिल्हा बँकेच्या सभागृहात पंचायत समिती उप सभापती बाबसाहेब म्हस्के, उप विभागीय कृषी आधीकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी आधीकारी दादासाहेब गायकवाड, जि.प.सदश्य शाम माळी, भरत अंत्रे, संतोष ब्राम्हणे, संचालक विजय खर्डे व तालूक्यातील दोनशे शेतकरी यावेळी उपस्थीत होते.

 

 

उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान अंतर्गत पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी व व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण, पिक प्रात्यक्षीक, ठिबक सिंचन व कृषी यांत्रिककीकरण यावर सरकारने भर दिला असून चालू खरीप हंगामात यांत्रीकीकरणअंतर्गत तालूक्यातील शेतकर्‍यांकडून ट्रॅक्टर साठी अर्ज मागविण्यात आले होते.

 

 

यासाठी 397 शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर साठी तर 553 शेतकर्‍यांनी औजारांसाठी अर्ज केले होते. आज ट्रॅक्टर साठी आलेल्या अर्जातून सोडत पध्दतीने लकी ड्रॉ काढण्यात आला. याची जेष्ठता सुची तयार करण्यात येवून प्राप्त अनुदाना प्रमाणे तालुका कृषी आधीकारी यांची पुर्व संमती देणार आहे. त्यानंतर शेतकर्‍यांनी त्यांचे अर्ज कागदपत्रे सादर करावे.

 

 

 

ट्रॅक्टर खरेदी केल्या नंतर दिड महिन्याच्या आत संबधीत शेतकर्‍याच्या खात्यावर अनुदान जमा होईल. नंबर आलेल्या शेतकर्‍याने दहा दिवसाच्या आत कागदपत्रे जमा न केल्यास सदर शेतकर्‍याची पुर्व संमती रद्द करून पुढील लाभार्थ्याला त्याचा लाभ दिला जाईल असे यावेळी स्पष्ट केले.

 

 

  औजारांसाठी 553 अर्ज प्राप्त आहेत. त्यानुसार संगणीकृत चिठ्या तयार करण्यात आल्या. मात्र, नजरचुकीने काही चिठ्या टाकायच्या राहून गेल्याने ड्रॉ स्थगित ठेवण्यात आला असून मंगळवारी 27 रोजी जिल्हा सहकारी बँक राहाता येथे सकाळी 11 वाजता पुन्हा ड्रॉ काढण्यात येणार असून लाभर्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.   औजारांसाठी 553 अर्ज प्राप्त आहेत. त्यानुसार संगणीकृत चिठ्या तयार करण्यात आल्या. मात्र, नजरचुकीने काही चिठ्या टाकायच्या राहून गेल्याने ड्रॉ स्थगित ठेवण्यात आला असून मंगळवारी 27 रोजी जिल्हा सहकारी बँक राहाता येथे सकाळी 11 वाजता पुन्हा ड्रॉ काढण्यात येणार असून लाभर्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. – दादासाहेब गायकवाडतालुका कृषी अधिकारी

LEAVE A REPLY

*