राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत नाशिकची स्वरांजली

0

नाशिक : ‘क्रीडा व युवक’ सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तर सोफ्टबॉल स्पर्धा नुकत्याच नागपूर येथे पार पडली.

या नाशिकच्या डे केअर सेंटर माध्यमिक शाळेच्या स्वरांजली रानडे हिची शालेय राष्ट्रीय स्पर्धासाठी निवड झाली. नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रातिनिधित्व करणार आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ली. जी. उगावकर, सचिव गोपाल पाटील, सहसचिव अंजली पाटील, सदस्य बाबा कुलकर्णी अनिल भंडारी, अजय ब्राम्हेचा, छाया निखाडे, अधीक्षक मुग्धा सपाटणेकर, मुख्यध्यापक शरद गीते आदींनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक बाळासाहेब रणशूर यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*