Type to search

क्रीडा नंदुरबार

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड जाहीर

Share

नंदुरबार | के. डी. गावित शैक्षणिक व क्रीडा संकुल पथराई येथे महाराष्ट्र राज्य फेन्सिंग असोशिएशन, नंदुरबार जिल्हा फेन्सिंग असोशिएशन व आदिवासी देवमोगरा एज्यूकेशन सोसायटी नटावद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सोळाव्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेच्या समारोपदिनी राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी महाराष्ट्र राज्य संघाची अंतिम निवड घोषित करण्यात आली.

पथराई येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचा काल अंतिम सामना होऊन समारोप झाला. या स्पर्धेतून खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखविण्याची संधी मिळाली होती. स्पर्धक व प्रशिक्षकांचा उत्साह, सामन्यासाठी केलेली तयारी, पात्र होण्याची अंतिम संधी, देशासाठी बाळगलेले खेळण्याचे स्वप्न यासारख्या विविध बाबींमुळे प्रत्येक सामन्यात चांगलीच चुरस पाहावयास मिळाली. स्पर्धेच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत औरंगाबाद, नागपूर, भंडारा, सोलापूर, मुंबई, लातूर, रायगड, कोल्हापूर संघाचे वर्चस्व राहिले. विशेषत: औरंगाबाद संघाने शेवटपर्यंत विजयात सातत्य ठेवत आघाडी कायम ठेवली.

दरम्यान अंतिम सामना होऊन समारोप कार्यक्रम झाला. समारोप कार्यक्रमासाठी भारतीय तलवारबाजी संघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, महाराष्ट्र फेन्सिंग असोशिएशनचे सचिव उदय डोंगरे, महाराष्ट्र फेन्सिंग असोशिएशनचे कोषाध्यक्ष प्रकाश काटोले, महाराष्ट्र फेन्सिंग असोशिएशनचे खजिनदार राजकुमार सुर्यवंशी, महाराष्ट्र फेन्सिंग असोशिएशनचे सहसचिव पांडुरंग रंगमाळ, या स्पर्धेचे प्रमुख राहूल मांडवकर, जळगांव फेन्सिंग असोशिएशनचे सचिव प्रशांत जगताप, आदेएसो नटावद संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक भिमसिंग वळवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हानिहाय विजयी संघ व राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यास पात्र खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली.तद्नंतर विजेत्यांना बक्षिस प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वितेसाठी आदिवासी देवमोगरा एज्यूकेशन सोसायटी नटावद या संस्थेतील प्रल्हाद संदानशिव, भागुराव जाधव, विठ्ठल मराठे, शांताराम मंडाले, उमेश राजपूत यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी अंतिम निवड झालेला महाराष्ट्र राज्य संघ असा-फोईल बॉंयज टीम ,तेजस पाटील – औरंगाबाद,भावेश मेश्राम – भंडारा,हर्ष – सोलापूर,अपूर्व चव्हाण – नाशिक. फोईल गर्ल्स टीम-वैभवी इंगळे – मुंबई,वैदीया लोहिया – औरंगाबाद,आरूषी सिंग – नागपूर,सारिका भुरे – रायगड.एपी बॉंयज टीम-अमेय कदम – औरंगाबाद,वेदांत पवार – सोलापूर,स्वयंम बोरसे – धुळे ,विश्वजित कुलकर्णी – उस्मानाबाद,एपी गर्ल्स टीम-ज्ञानेश्वरी शिंदे – लातूर,अनुजा लाड – रायगड, वैष्णवी घोलवडकर – अहमदनगर,हर्षदा कुली – सोलापूर. सेबर गर्ल्स टीम-कशिश भराड – औरंगाबाद,अदिती सोनवणे – नाशिक, मेहक रेवानी – रायगड,श्रूती जोशी – नागपूर.सेबर बॉंयज टीम-निखिल वाघ – औरंगाबाद,पियूष वाडूले – औरंगाबाद,हर्षद सपकाळ – रायगड,साहिल चव्हाण – मुंबई यांची निवड करण्यात आली.तर सर्वसाधारण विजेतेपद मुले-१)औरंगाबाद २)भंडारा ३)कोल्हापूर. मुली-१)औरंगाबाद,२)लातूर,३)नागपूर या संघांना घोषित करण्यात आले.

स्पर्धेविषयी खेळाडूंच्या प्रतिक्रिया

मी याआधी थायलंड ओपन चँपियनशिप २०१८ खेळून आलेली आहे. या स्पर्धेतून पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर खेळण्यास संधी मिळाली असून पुन्हा आंतरराष्ट्रीय सामने लढविण्याची इच्छा आहे.-

आरूषी सिंग

पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात नंदुरबार हे आमच्यासाठी नविनच होते. येथील सुसज्ज इनडोअर स्टेडियम व स्पोर्टस हब बघून प्रसन्न वाटले.

वैभवी इंगळे

देशाचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव नेहमी उंचावर राहावे असे माझे स्वप्न आहे. स्पर्धा कठिण होती पण पाहूणचार चांगला होता म्हणून स्पर्धा व नंदुरबार नेहमी स्मरणात राहिल.

साहिल चव्हाण

राज्यस्तरीय स्पर्धेआधी कसून सराव केला होता त्यामुळे स्पर्धा जिंकण्यासाठी फार मोठी मेहनत करावी लागली नाही. राष्ट्रीय स्तरावरही सातत्य ठेवावे लागेल.

तेजस पाटील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!