Type to search

क्रीडा नंदुरबार

राष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक

Share

नंदुरबार । देहरादून (उत्तराखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने रौप्य पदक पटकाविले. दिल्ली, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या संघाचा पराभव करुन उपविजेते पदाचे मानकरी ठरले.

उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन व पारस क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दि.8 ते 11 जून 2019 दरम्यान देहरादून येथे 5 वी राष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत एकुण 16 संघांनी सहभाग नोंदविला. त्यात महाराष्ट्र संघाने दिल्ली, उत्तराखंड, उत्तरप्रदेश संघांना पराभूत करत रौप्य पदक पटकाविले. या महाराष्ट्र संघात यश महाजन (कर्णधार), महेश पाटील (उपकर्णधार), हर्षवर्धन शिंदे, सुयोग वळवी, राम ठाकरे, अंकीत सुर्यवंशी, निखिल सुर्यवंशी, मोहित मराठे, कुणाल पाटील, दर्श रघुवंशी, गौरव माळी, कार्तिक सुगंधी यांचा समावेश होता.

यावेळी राम ठाकरे, सुयोग वळवी, यश महाजन, महेश पाटील यांनी उत्कृष्ठ कामगिरी करत आपल्या संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. विजयी संघास प्रशिक्षक दिनेश भील व जगदिश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष संजय होळकर, प्रा.डॉ.मयुर ठाकरे, नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र माळी आदींनी विजयी संघाचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर विजयी संघास महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेटचे सचिव जगदिश वंजारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!