Type to search

जळगाव

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या संस्थेला जिल्हा बँकेची नोटीस

Share

जळगाव । राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील अध्यक्ष असलेल्या संत मुक्ताबाई संस्थानने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 1992 ते 18 नोव्हेंबर 2000 या कालावधीत घेतलेल्या सुमारे 89.20लाख रुपये कर्जापोटी एकूण 4 कोटी 25 लाख 19 हजार रूपये व्याजासहीत 30 दिवसाचे आत भरणा करणेची वसुली नोटीस जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून बजावण्यात आली आल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर यांना कर्ज उपसमितीतर्फे 18 नोव्हेंबर 1992 रुपये 40 लाख, 12 मार्च 1993 संचालक मंडळ सभा रक्कम रु.10लाख, 24 मे 93 कर्ज उपसमिती सभा रक्कम रु.7 लाख, 25 आक्टोबर संचालक सभा रक्कम रु.28 लाख, 18 नोव्हेबर 2000 शेअर्स शॉर्टफॉल रक्कम रु.4.20 लाख कॅशक्रेडीट कर्ज असे 89.20 लाख रूपये कर्ज मंजूर झाले होते. संस्थानचे 22 मार्च 2003 च्या पत्रानुसार विषय क्र.6 निर्णय घेवून 89.20 लाख रुपये व व्याज 73.99 लाख असे एकूण 163.19 लाख रुपये रकमेपोटी 35.25 लाख रुपये रकमेचा भरणा करुन संस्था कर्जमुक्त करण्याचा ठराव केला होता. या कर्ज रकमेचा वसुली दावा सहकार न्यायालयात व्याज या कर्जरकमांच्या वसुलीसाठी दावा कलम 91 अन्वये 13 फेब्रुवारी 1998 सहकार न्यायालय यांनी बँकेच्या लाभात दि.13 फेब्रुवारी 1998 रोजी निर्णय दिला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था 107 (10) नुसार 22 आक्टेाबर 2012 रोजी संस्थान अध्यक्षांनी हरकत घेतल्यानंतर तहसिलदार यांच्याकडे दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर 11 मार्च 2016 रोजी बँकेच्या लाभात निर्णय देण्यात आला असून मालमत्तेवर बोजा बसविण्यात आला आहे.

तसेच लेखापरीक्षणात बँक संचालक व संस्थान अध्यक्ष एकच असतांना सूट देणे अयोग्य आहे. शिवाय मुद्दलात तसेच व्याजात सूट देण्याची तरतूद नाही तसेच तशी पूर्वपरवानगी विभागीय सहनिंबंधक यांची मंजुरी आवश्यक आहे. यामुळे ठेविदारांच्या हितास बाधा उत्पन्न होईल, असे आक्षेप घेऊन संस्थानकडून उर्वरित रकम वसूल करणेबाबत सुचित करण्यात आले आहे.

कार्यकारी संचालकांनी नोटीस बजावली

27 ऑगस्ट 2018 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ठरावानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी असा निर्णय असून 30 सप्टेबर 2019 अखेर संस्थानकडे 89.22 लाख मुद्दल व व्याज 335.97 लाख, असे एकूण 425.19 लाख रुपये कर्जभरणा नोटीस मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आत करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कार्यकारी संचालक जिल्हा मध्यवर्ती बॅक जळगाव यांनी संत मुक्ताबाई संस्थान यांना दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!