राष्ट्रवादीशी वाटाघाटी करुन उमेदवार देणार – ना.पाटील

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना एकत्र येणार असून राष्ट्रवादीशी वाटाघाटी करून उमेदवार दिला जाणार असल्याची माहीती सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली.

शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांची ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.किशोर पाटील यांच्यासह सर्व जि.प सदस्य उपस्थित होते. बैठकीत ना.पाटील यांनी सर्व सदस्यांची भुमिका जाणून घेतली.

यावेळी राष्ट्रवादी सोबत आल्यास शिवसेना वाटाघाटी करून उमेदवार देईल असे ना.पाटील यांनी सांगितले.दरम्यान अध्यक्षपदाची निवडणूक सोपी नसल्याचेही ना.पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीने व्हिप काढून निवडणुक लढविण्याचा निर्णय कालच जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना अध्यक्षपदाची निवडणूक सोबत लढविणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

राष्ट्रवादी नेत्यांशी चर्चा

अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस व शिवसेना एकत्रित येण्याची चिन्हे आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन वेळा चर्चा झाली असल्याची माहिती राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादीचे तीन सदस्य गायब

राष्ट्रवादीचे तीन सदस्य भाजपाच्या संपर्कात असल्याने हे तिन्ही सदस्य त्यांच्या गावी नसल्याचेही माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी उमेदवार देवून व्हिप काढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित येतील की नाही याबाबत साशंकता आहे.

चमत्काराची शक्यता

अध्यक्ष पदासाठी शिवसेना राष्ट्रवादी-कॉंग्रेस एकत्र येवून अध्यक्षपदाची निवडणुक लढविणार आहे. त्यामुळे शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाल्यास चमत्कार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

*