राष्ट्रवादीत टग्यांच्या पदांवर संक्रांत

0

अजितदादांचा नेत्यांना कानमंत्र अन् कानउघाडणी

दादा उवाच…पक्ष संघटनेवरून कार्यकर्त्यांना फटकारले संधी मिळूनही रिजल्ट मिळत नसले तर पदावरून बाजूला व्हा राजकारणात कोणाची मक्तेदारी नाही पुढार्‍यांचे पोर काम करत नसेल तर त्याला बाजूला करा ज्येेष्ठ नेत्यांनी आता वडिलकीची जबाबदारी स्वीकारावी नवीन चेहर्‍यांना पुढे आणले पाहिजे नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालावा 31 जुलैपर्यंत 24 आघाड्याचे पदाधिकार्‍यांची निवड झाली पाहिजे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- पक्ष संघटनेत चांगले काम करण्यांना संधी देणे आवश्यक आहे. चुका माणसांच्या हातून होतात. मात्र, त्यातून सुधारणा होणे आवश्यक आहे. संघटनेत पदे मिळाल्यावर त्यातून पक्ष वाढीसाठी कार्य व्हावे आणि जनतेचा विश्‍वास संपादन व्हावा. नुसती लेटरपॅडवर आणि पाकिटावर नाव छापण्यासाठी पदांचा वापर होवू नये. पक्ष संघटनेत पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर रिझल्ट देता येत देत येत नसले तर पद सोडा. पुढार्‍यांची पोरं काम करीत नसतील तर त्यांना बाजूला करा. चुकीचे वागणारे, वाळूमाफिया आणि गावावर ओवाळून टाकलेल्यांना राष्ट्रवादीत संधी देवू नका, असा कानमंत्र देत  पान 2 वरअहमदनगर (प्रतिनिधी)- पक्ष संघटनेत चांगले काम करण्यांना संधी देणे आवश्यक आहे. चुका माणसांच्या हातून होतात. मात्र, त्यातून सुधारणा होणे आवश्यक आहे. संघटनेत पदे मिळाल्यावर त्यातून पक्ष वाढीसाठी कार्य व्हावे आणि जनतेचा विश्‍वास संपादन व्हावा. नुसती लेटरपॅडवर आणि पाकिटावर नाव छापण्यासाठी पदांचा वापर होवू नये. पक्ष संघटनेत पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर रिझल्ट देता येत देत येत नसले तर पद सोडा. पुढार्‍यांची पोरं काम करीत नसतील तर त्यांना बाजूला करा. चुकीचे वागणारे, वाळूमाफिया आणि गावावर ओवाळून टाकलेल्यांना राष्ट्रवादीत संधी देवू नका, असा कानमंत्र देत

राष्ट्रवादीचे नेत आ. अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांनाही फटकारले.
नगरमधील सहकार सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. मेळाव्या अध्यक्षस्थांनी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड होते. यावेळी विधान सभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, जिल्ह्याचे प्रभारी अंकुश काकडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे आ. जयदेव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, विद्यार्थी राष्ट्रवादी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, युवती आघाडीच्या अध्यक्षा आ. स्मिता पाटील, आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, सभापती कैलास वाकचौरे, उमेश परहर, विठ्ठलराव लंघे, पांडूरंग अंभग यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.
पवार यांनी पक्ष संघटनेवर चौफर फटकेबाजी केली. त्यांच्या फटकेबाजीतून ज्येष्ठ नेते पिचड, दादा कळमकर, प्रताप ढाकणे, सुजीत झावरे आणि आमदार जगताप परिवार हे देखील सुटले नाही. राष्ट्रवादीच्या पक्षाच्या 24 प्रकाराच्या विविध आघाड्या आहेत. या आघाड्यांवर 14 तालुक्यांतील पदाधिकार्‍यांच्या नेमणुका 31 जुलैपर्यंत करण्याची डेडलाईन पवार यांनी यावेळी दिली. तसेच हे करत असतांना जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील आणि जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी नवीन चेहर्‍यांना संधी द्या, काम करणार्‍यांना संधी द्या.
या पदाधिकार्‍यांच्या निवडी करतांना कोणाच्या दबावाला बळी पडू नका, तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्र असे अधिकार जिल्हाध्यक्ष घुले यांना दिले. मात्र, त्यासोबत घुले यांच्यावर कारखान्यांसह अन्य जबाबदारी असली तरी त्यांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्षा पुरेसा वेळ द्यावा. आमच्यावर विविध जबाबदार्‍या असतांना पक्ष संघटनेसाठी आम्ही वेळ काढत असल्याचे दाखला त्यांनी यावेळी दिला.

पवार यांनी तालुकानिहाय जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचा जाहीर आढावा घेतला. हा आढावा घेत असतांना त्यांनी अनेकांचे कानही टाचले. मी माझ्या स्वभावात बदल केला असून तुम्ही का स्वभाव बदलत नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. यामुळे एकच हशा पिकला. राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभा निवडणुकीत जेवढे नुकसान व्हायचे होते, तेवढे झाले. यापेक्षा पक्षाचे आणीखन काय वाईट होणार? असे विचारीत आता नव्याने सुरूवात करण्याची ही वेळ आहे. यासाठी आधी पक्ष संघटना अधिकाअधिक भक्कम करण्याचे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

यावेळी आ. गायकवाड, वाघ, कोते, वळसे, पिचड यांचे मनोगत झाले. प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष घुले यांनी केले.

सरकार दररोज नवीन जी. आर. काढत आहेत. यामुळे बँकांचे अधिकार्‍यांची डोकी गरगरली आहेत. राज्यातील किती लोकांना कर्जमाफीचा फायदा होणार हे सांगण्यास सरकार तयार नाही. ही कर्जमाफी आहे की कर्जवसूली आहे हे कळण्यास तयार नाही. 8 लाखांचे कर्ज असले तर अधी रोखीने साडे सहा लाख भरा आणि पावती दाखवा. मग सरकार दीड लाख रुपयांची कर्जमाफी देणार हा प्रकार कर्जमाफी नव्हे कर्ज वसूलीचा असल्याची टीका पवार यांनी केली. हे सरकार आणि त्यातील मंत्री खडी का खुळी हे कळेणाच असे पवार म्हणताच पुन्हा हश्या पिकला.

नात्यागोत्यामुळे लय अडचण होते राव…
नगर तालुक्यात राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत अवघी एक जागा मिळाली. यामुळे आ. संग्राम जगताप यांनी तालुक्यात लक्ष घालावे, अशी सुचना पवार यांनी केली. पण तालुक्यात नात्यागोत्यामुळे लय अडचण होते राव, कोणाला काय सांगावे हेच काळत नाही. घोडे कुठे पेंड खाते हे कळत असे पवार म्हणाताच एकच हशा पिकला. पारनेर तालुक्यात सुजित झावरे यांना आमदारकी दिली. त्यात ते पडले, मग जिल्हा परिषद दिली. त्यातही पडले. सुजीत झावरे आता स्वभाव बदला. दिलीप वळसे पाटील लक्ष देत नाही, अशी तक्रार झावरे करतात. आता काय वळसे यांनी सुजीतचा फोटो काढून तो पाहत बसावा की काय? असे म्हणताच हशात आणखीन भर पडली. त्याच पारनेरमध्ये दादा कळमकर यांनी वडिलकीच्या नात्याने लक्ष घालवे. मात्र, काही झाले तरी आता कळमकर यांना पारनेर मतदारसंघातून विधान सभेचे तिकीट मिळणार नाही. मोठ्या पवार साहेबांनी सांगितले तरी ते अशक्य असल्याचे पवार म्हणताच सभागृह हास्यात बुडाले.

 

LEAVE A REPLY

*