राष्ट्रवादीत अजूनही प्रोटोकॉल कायम ; पदाधिकरयांनी घेतले भुजबळांचे आशिर्वाद

0

नाशिक : मनी लाँड्रीगप्रकरणी तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे सुनावणीसाठी मुंबई न्यायालयात आले असता पक्षातील पदाधिकारयांनी त्यांची भेट घेत साहेब आशिर्वाद असू द्या अशी विनवणी केली. तर काहींनी त्यांचे चरणही स्पर्श करत जिल्हा परिषेच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा केल्याचे समजते यावरून राष्ट्रवादीत अद्यापही प्रोटोकॉल कायम असल्याचे दिसले.

विशेष म्हणजे भुजबळ विरोधक म्हणून ओळखल्या जाणारया पक्षातीलच काही पदाधिकारयांनी आज चक्क भुजबळांचे आर्शिवाद घेतल्याने हा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला. निवडणुकांपुर्वी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी कार्यक्रमाच्या पोस्टरवरून भुजबळ यांचे छायाचित्र काढलेे होते.

याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या पोस्टवर भुजबळांचे चित्र झळकू लागले. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषदांचा रणसंग्राम सुरू झाला. यावेळी प्रत्येक मेळाव्यात अन बैठकीत पदाधिकारयांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव कटाक्षाने घेतले.

तसेच पक्षाच्या जाहीरनाम्यातही भुजबळांचे छायाचित्र वापरले तसेच त्यांच्या कालावधीत झालेले काम जाहीरनाम्याव्दारे पोचवले. छगन भुजबळांवरील कारवाई ही सूडभावनेने होत असल्याचेही काहींनी मेळाव्यातून सांगितले. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी लोकभावनांचा आदर राखण्यासाठी भुजबळांना दूर ठेवल्याची भावना बोलूनही दाखविली. या सर्व घडामोडी होत असल्या तरी पक्षावर भुजबळांचीच पकड असल्याचा अनुभव नुकताच आला.

शुक्रवारी मुंबई न्यायालयात छगन भुजबळ यांची सुनावणी होती. यावेळी नाशिकमधील आमदार दिलीप बनकर, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, जिल्हा परिषदेत गटात विजयी झालेल्या अमृता पवार, उदय जाधव, डॉ. सयाजी जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, दिलीप खैरे, राजेंद्र शिंदे, उषा बच्छाव, लासगाव गटातील बबन शिंदे, येवला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष वसंत पवार, अरूण थोरात आदींसह समर्थकांनी भुजबळ यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचाली गतीमान झाल्या असून नाशिकमध्ये अध्यक्षपदसाठी शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर काहींनी जिल्हा परिषद अध्यक्षपद तसेच इतर पदांवर वर्णी लागावी यासाठी आशिर्वाद राहू द्या अशी भावना भुजबळांकडे व्यक्त केली. तर काहींनी साहेबांचा हात सदैव पाठीवर असावा म्हणून चरणस्पर्श केल्याचे समजते.

एरव्ही भुजबळांच्या विरोधात उभे ठाकरणारे तसेच त्यांच्या कधी भेटीसाठी न येणारे पदाधिकार्रीे निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच पुढील भवितव्यासाठी भुजबळांच्या भेटीला आल्याचे पाहून प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. यावरून अजूनही राष्ट्रवादीत भुजबळांचाची निर्विवाद सत्ता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यानिमित्ताने प्रोटोकॉल पाळण्याचे काम पदाधिकारयांनी नियमाने केल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*